चौकीदार चोर नव्हे, प्रामाणिक – राजनाथसिंह

भद्रक: देशाचा चौकीदार चोर नव्हे तर प्रामाणिक आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले आहे. आज ओडिशात पक्षाच्या एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीनंतरही मोदी हेच प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि उत्तम कार्यक्षमतेने देशाची सेवा करीत राहतील.

राफेल प्रकरणावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर हेै अशी टीका सातत्याने केली आहे त्यावर जोरदार आक्षेप घेताना राजनाथसिंह म्हणाले की पंतप्रधानांच्या प्रामाणिकपणावर आणि त्यांच्या निष्ठेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. विरोधीपक्षांनी सरकारच्या कारभारावर जरूर टीका करावी पण त्यांनी असे बेजबाबदार आरोप करू नयेत असे आव्हानही त्यांनी केले. देशातील सर्व समस्यांवर केवळ मोदी हे एकच उत्तर आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. देशातील सर्वच पक्षाचे नेते पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या पदाची प्रतिष्ठा कायम राखण्याचा प्रयत्न करतात पण राहुल गांधी मात्र तोंडाला येईल ते आरोप करीत असतात असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.