नागौर – येथील देशातील पहिल्या कबूतरशाळेत पक्ष्यांसाठी 7 मजली बंगला तयार करण्यात आला आहे. यात विविध मजले आणि फ्लॅटच्या हिशेबाने एकाचवेळी सुमारे 3 हजार पक्ष्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. तर टॉवरखाली उभारण्यात आलेल्या स्टँडवर 24 तास पक्ष्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था असणार आहे.
चंचलदेवी बालचंद लुणावत ट्रस्ट अजमेरकडून पीह गावात उभारण्यात आलेल्या या 65 फूट उंच 7 मजली बर्ड हाउसवर सुमारे 8 लाख रुपयांचा खर्च करण्या आला आहे. 26 जानेवारी रोजी याचे उद्घाटन होणार आहे.
— INDIA NEWS RAJASTHAN (@indianewsraj1) January 25, 2022
नागौर जिल्हय़ा अरावली पर्वतरांगेच्या पायथ्याला वसलेल्या पीह गावात देशातील पहिली सुव्यवस्थितत कबूतरशाळा देखील चालविली जाते. आता त्याच्याच परिसरात अन्य पक्ष्यांसाठी हा 7 मजली टॉवर उभारण्यात आला आहे. तसेच तेथे मुलांसाठी उद्यान आणि वृद्धांसाठी प्रार्थना कक्षही आहे. गावातील वृद्ध लोक कबुतरांना दाणे टाकल्यावर तेथे भजन-किर्तन करतात. परिसरात 400 रोपांची लागवड करण्यात आली आहे. दिवसाला 5-6 पोत्यांमध्ये मावेल इतके धान्य कबूतरांसाठी वापरले जाते.
दर महिन्याला 3 लाखांचा खर्च
कबूतरशाळेसाठी दर महिन्याला सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च केला जातो. तर बर्ड हाउस उभारल्याने पक्ष्यांसाठीचा खर्चही वाढणार आहे. पक्षी घरासोबत पक्ष्यांना प्यायला पाणी मिळावे म्हणून एक वॉटर पूलही निर्माण करण्यात आला आहे.