विना निविदा कचरा प्रकल्प तातडीनं रद्द करावा – सुतार

पुणे – शहरातील रामटेकडी येथील सुमारे 40 हजार टन कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदारांना विनानिविदा 9 काेटी खर्चाचे काम देण्याबाबत आपण विषयपत्र ठेवले हाेते व ते स्थायी समितीमार्फत मान्य केले. परंतू सध्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे म्हणून प्रशासनाने अनेक विकासाची कामे बंद केली.

अंदाजपत्रकातील खर्चाबाबत प्राधान्यक्रम ठरवून 30 ते 40 टक्के कामे करण्याबाबतचा निर्णय स्थायी समितीमार्फत प्रशासनाने घेतला हे निश्चित या विषयाशी विसंगत आहे. एकीकडे निधी नाही म्हणून कामे थांबवायची व दुसरीकडे अशी चुकीची कामे करून उधळपटटी करायची.

पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेने कचरा प्रक्रियेचे काम करण्यासाठी 530 रू दर निश्चित केला असताना, प्रशासनाने परस्पर 900 रू दर निश्चित करून सर्वसाधारण सभेच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. प्रत्यक्षात जमा हाेणारा कचरा व प्रशासनानी नवीन ठेवलेल्या विषयपत्रातील जमा हाेणारा कचरा यामध्ये प्रचंड तावत आहे.

मागील चार वर्षांमध्ये मनपाने काेणकाेणाला काेणत्या ठिकाणी कचरा प्रक्रिया करण्याचे काम दिले हाेते, प्रथमतः जाहीर करावे. सध्याच्या कच-याच्या समस्येला जबाबदार असणा-या व मनपाचे आर्थिक नुकसान करणा-या संबंधित आहेत, त्यामुळे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळत आहे.
सामान्य पुणेकरांचे कररूपी पैशांची अशा प्रकारे उधळपटटी करण्यास आमच्या पक्षाचा विराेध आहे.

तरी मा.आयुक्त यांनी सदरच्या विषयपत्राची कार्यवाही त्वरीत स्थगित करावी. अन्यथा आम्हाला पुणेकरांसह आंदाेलन करणेशिवाय पर्याय राहणार नाही व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असे पत्र देऊन शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.