पाण्याची नासाडी; चौघांना नोटीसा

सातारा – शहरात पाणी वाचवण्यासाठी पालिकेच्यावतीने आटोकाट प्रयत्न सुरु आहे. मात्र तरीही पाण्याची उधळपट्टी सुरूच राहिल्याने साताऱ्यात चौघांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच एक मोटार जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी या कारवाईला दुजोरा दिला.

गुरूवार पेठ, शनिवार पेठ व बोगदा परिसरात या कारवाया करण्यात आल्या. काही नागरिक पाण्याची उधळपट्टी करत असल्याच्या तक्रारी आल्याने पाणीपुरवठा विभागाने आक्रमक कारवाया सुरू केल्या आहेत. एका नागरिकाने तर चक्क पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली होती. त्याचीच दखल घेऊन आधी समज अन्यथा फौजदारी कारवाई असा दंड करण्याचा सिलसिला सुरू झाला. मंगळवारी झारीचा बोळ येथून आनंद हिरालाल परदेशी यांची मोटार जप्त करण्यात आली. बी. बी. मोहिते भवानी पेठ, सुहास शिंदे रविवार पेठ, निनाद पवार रविवार पेठ या तिघांना पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल नोटीसा बजावण्यात आल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.