छावणी परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या कचरा संकलन डस्टबीन वाटपात घोटाळा

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची चौकशीची मागणी

नगर – भिंगार येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोमिन गल्ली, मुलान गल्ली, गाडेकर गल्ली याभागात डस्टबीन अद्यापही वाटप झाले नाही .त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेही शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद समवेत रमेश हरबा, शानवाज काजी, शाकिर शेख,शोहेब शेख,लियाकत शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सय्यद म्हणाले की स्वच्छतेच्या निमित्ताने छावणी परिषदेच्या वतीने देण्यात येणारे कचरा संकलन डस्टबीन चे प्रत्येक नागरिकाला ओला-सुका कचरा वर्गिकृत करण्यासाठी डस्टबीन देण्यात येणार आहे ते डस्टबीन छावणी परिषदेचे नगरसेवकांच्या मार्फत वाटप करण्यात आले या वाटपामध्ये नगरसेवकांनी कचऱ्याच्या डब्यावर राजकारण केले व नगरसेवकांनी हळदी कुंकूचा प्रभागांमध्ये कार्यक्रम घेऊन हे डबे स्वतःचे म्हणून वाटप करण्यात आले.

डस्टबीन चा संपूर्ण खर्च हा छावणी परिषदेने केलेला आहे. याचे वाटप कॅंन्टोनमेंटमार्फत असते .परंतु कॅन्टोनमेंट कर्मचाऱ्यांकडून न देता प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांच्या हाताने देण्यात आले. असे जर झाले तर घरपट्टी व पाणीपट्टी सुद्धा नगरसेवकांच्या हातून मागवण्यात यावे व कचरा संकलन डस्टबीन वाटपामध्ये घोटाळा केला असून याबाबत कोणत्या नगरसेवकाला किती डस्टबीन दिले याची चौकशी करावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.