लाहोर – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने पाकिस्तानकडून 36 कसोटी सामने खेळत 119 विकेट घेतल्या. त्याने अखेरची कसोटी दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळली होती. मोहम्मद अमीर याचा कसोटीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रम याने मांडले आहे.
वासिम अक्रम म्हणाला की,’ मोहम्मद अमीर याचा कसोटीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. 27 व्या वर्षीच कसोटीतून माघार घेणे म्हणजे चांगल्या दर्जाच्या क्रिकेटला मुकण्यासारखेच आहे. कसोटी हाच या खेळाचा आत्मा असून त्यामध्येच खेळाचा खरा आनंद मिळविता येतो. अमीरने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा’.