वॉशिंग्टन – भारताच्या लिएंडर पेस व रोहन बोपण्णा यांना वॉशिंग्टन एटीपी टेनिस स्पर्धेतील दुहेरीत पराभवाचा धक्का बसला. हे दोन्ही खेळाडू येथे परदेशी खेळाडूंसमवेत उतरले होते.
पेस व जॅक सोक यांना ऍलेक्स मिनॉर व जॉन पिअर्स यांनी सरळ दोन सेट्समध्ये हरविले. हा सामना त्यांनी 7-5, 6-2 असा जिंकला. बोपण्णाने येथे बेनॉईट पिअरीच्या साथीत भाग घेतला होता. या जोडीला मॅथ्यू एबडेन व निकोलस मोन्रो यांनी 2-6, 6-3, 10-7 असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये बोपण्णा व पिअरी यांनी फोरहॅंडचे ताकदवान फटके व बिनतोड सर्व्हिस असा बहारदार खेळ केला.