अबुधाबी – आयपीएलच्या या पर्वामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाची निराशाजनक कामगिरी आजही कायम राहिली. चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्धारित २० षटकांमध्ये चेन्नईला ५ गाड्यांच्या मोबदल्यात केवळ १२५ धावा जमवता आल्या. चेन्नईने समोर ठेवलेले १२६ धावांचे आव्हान राजस्थान रॉयल संघाने १७.३ षटकांत सहजरित्या पार केले.
तत्पूर्वी, चैन्नईकडून कर्णधार धोनीने २८ चेंडूत २८ धावा केल्या तर जडेजाने ३० चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक ३५ धाव केल्या.
विजयासाठी १२६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाला सुरुवातीला काही धक्के बसले. मात्र त्यानंतर स्टीव्ह स्मिथ व जॉस बटलर या जोडीने डाव सावरत ९८ धावांची विजयी भागीदारी केली.