अकोला – प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवसात (मंगळवार दि.14 ते शनिवार दि. 18 मार्च) विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
#अकोला प्रादेशीक हवामान विभाग नागपुर यांच्यासंदेशानुसार मंगळवार दि.१४ ते शनिवार दि.१८दरम्यान अतिवृष्टी,विजांचा कडकडाट,ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी-आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुचना pic.twitter.com/fgdlHyNVJc
— DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA (@InfoAkola) March 14, 2023
या कालावधीत विजांचा कडकडाट,अतिवृष्टी तसेच दि. 16 ते 18 दरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षीत ठिकाणी साठवावा.
Kisan Long March : आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत – अजित पवार
बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षीत ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही; याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केल्या आहेत. यासुचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.