#CWC19 : वॉर्नरने मोडला धवनचा विक्रम

नॉटिंगहॅम – बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने आपल्या फलंदाजीद्वारे आपल्या टिकाकारांना शांत करत विश्‍वचषकात चमकदार कामगिरी नोंदवताना बांगलादेशविरुद्ध सामन्यात वॉर्नरने शतक झळकावत आपल्या संघाला दमदार सुरुवात करुन दिली. डेव्हिड वॉर्नरचं एकदिवसीय क्रिकेटमधले हे 16 वे शतक ठरले आहे.

सर्वात कमी डावांमध्ये 16 शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला आहे. शिखरने 126 डावांमध्ये 16 शतक केले होते, तर वॉर्नरने केवळ 110 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली. या यादीत हाशिम आमला 94 डावांत 16 शतक करत पहिल्या स्थानी आहे. तर, विराट कोहली 110 डावांत 16 शतक करत दुसऱ्या स्थानी आहे.

त्याच बरोबर वॉर्नरने या खेळीते केलेले विक्रम पुढील प्रमाणे –

1) विश्‍वचषक इतिहासात दोनवेळा 150 पेक्षा जास्त धावा करणारा वॉर्नर पहिला फलंदाज ठरला आहे.
2) 2019विश्‍वचषक स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक वैय्यक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला आहे. (बांगलादेशविरुद्ध सामन्यात 166 धावा)
3) डेव्हिड वॉर्नर आणि अरॉन फिंच जोडीने 2019 विश्‍वचषक स्पर्धेत पाचव्या अर्धशतकी भागीदारीची नोंद केली आहे. या व्यतिरीक्त कोणत्याही जोडीच्या नावावर 3 पेक्षा जास्त अर्धशतकी भागीदाऱ्यांची नोंद नाहीये.
4) वन-डे क्रिकेटच्या इतिहासात 6 वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात दीडशतकी खेळी करणारा वॉर्नर पहिला फलंदाज ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)