शिमला – जागतिक तापमान वाढीमुळे (Warming hampers) वनस्पतींच्या परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होत आहे. त्यामुळे जागतिक अन्नसुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पालमपूरच्या शास्त्रज्ञांनी हा खुलासा केला आहे. (Himalayan Bioresources)
इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कोमल गोयल, डॉ. प्रवेश कुंडू, डॉ. पारस शर्मा आणि डॉ. गौरव झिंटा यांनी त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे की, हवामान बदलामुळे दैनंदिन तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. वनस्पतींमधील परागीभवन प्रक्रियेवर त्याचा विपरित झाला आहे.
वनस्पतींच्या वाढीदरम्यान तापमानात वाढ झाल्याने परागकणांच्या विकासाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे परागणानंतर उगवणाचा दर कमी होत आहे. याचा थेट परिणाम उत्पन्नावर होत आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाश्या नाहीशा होत आहेत. बागांमध्ये फुलोरा सुरू असताना वन्य मधमाशा बागांमध्ये पोहोचतात आणि नैसर्गिक परागीभवनामुळे सर्व पिकेही चांगली जोमाने वाढू लागतात. मात्र, विविध रसायने कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे वन्य मधमाश्या आता पिकांवर येत नाहीत.
सफरचंदांचा पट्टा १००० फुटांवर सरकला
फळ, भाजीपाला आणि फूल उत्पादक संघटनेचे राज्य अध्यक्ष हरीश चौहान सांगतात की, जागतिक तापमानवाढीमुळे सफरचंदाच्या लागवडीवरही परिणाम झाला आहे. पूर्वी ४५०० फूटांवर सफरचंदांची उत्तम लागवड करता येत असे. आता ही उंचीएक हजार फूटाने वाढली आहे. आता ५५०० फूटांवर सफरचंद लागववड करावी लागते. त्यामुळे उत्पादनही कमी होत आहे.