पुणे – चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक वारजे येथे घडला होता आहे याप्रकरणी वारजे पोलिसांनी तेथे राहणाऱ्या एका 28 वर्षाच्या नराधमाला अटक केली होती.
मात्र तो शनिवारी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. तो पसार झाल्याचे कळताच वारजे पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावून परिसर पिंजून काढला. यानंतर संबंधीत आरोपी रविवारी एका दारु गुप्त्त्यावर पोलिसांना सापडला.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर राहतो. त्याने 4 वर्षाच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आवाजामुळे हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. वारजे पोलिसांनी तत्काळ या आरोपीला शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. इतक्या गंभीर गुन्हयातील आरोपी पळून गेल्याने वारजे पोलिसांवर टीकेचा भडिमार झाला होता.
– दत्तवाडी पोलीस ठाण्यातूनही मनोरुग्ण पळाला –
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मनोरुग्ण तरुणाने रुग्णवाहिका अडवून तब्बल दोन तास धिंगाणा घातला होता. रस्त्यावरील दगड उचलून तो वाहनांवर मारण्याचा प्रयत्न करत होता. लसीकरणासाठी लस पोहचवणाऱ्या रुग्णवाहिकेचा ताबा घेतल्याने मोठा बाका प्रसंग उदभवला होता. वाहतूक पोलिसांनी कसे बसे त्याला पकडून दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र तेथून तो पसार झाला.