तुकोबांच्या अश्‍वांची नेत्रदीपक दौड

पुणे – वारकऱ्यांमधील उत्साह, हरिनामाचा जयघोष आणि अश्‍वांबरोबर धावणारे वैष्णवजन अशा आसमंत व्यापणाऱ्या वातावरणात तुकाराम महाराजांच्या पालखीचा उभे रिंगण माळीनगरमध्ये रंगले. लाखो वारकऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी हा सोहळा डोळ्यांमध्ये टिपला. टिपलेला टाळ, व वारकऱ्यांच्या मुखातून येणारा माऊली-माऊली आवाज यामुळे रिंगणात सोडलेले दोन्ही अश्‍व काही क्षणात परिक्रमा पूर्ण करीत चरण पादुकांना दर्शनासाठी पालखी जवळ दाखल झाले. अश्‍वांच्या परिक्रमा पूर्ण होतात रिंगण स्थळावर हजारो महिला पुरुषांनी फुगड्या धरल्या तर कित्येकांनी लगोऱ्या रचल्या त्यामुळे रिंगणातील उत्साह ओसांडून वाहत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.