ज्ञानेश्वर महाराज : गेली 36 वर्षे पंढरीची पायी वारी करणारा अवलिया…

आळंदी पासून नाही तर, आपल्या गावापासून पायी पंढरीची वारी करणारा वारकरी ज्ञानेश्वर महाराज हे हिंगोली जिल्ह्यातील असून गेल्या छत्तीस वर्षांपासून पायी पंढरपूरची वारी करतात. त्यांनी स्वतः नाही तर, आपल्या गावातील अन्य लोकांना सुद्धा घेवून दिंडीची सुरुवात केली.

एक मुलगा व एक मुलगी यांना उच्च शिक्षण देवून डॉक्टर केले. तर, एका मुलाला वैष्णवांची पताका अविरत चालू रहावी म्हणून कीर्तनकार केले. मुलगा सोपान महाराज सानप आज नामांकित कीर्तनकार असून उच्चशिक्षित आहेत. त्यांचे वय 31 असून त्यांनी आज पर्यंत 30 पंढपुर वारी केल्या आहे. लहान असतांना आईच्या कडेवर वारी केली तर आज माऊलींच्या रथाच्या मागील 225 नंबरची दिंडीचे ते स्वतः नेतृत्व करतात. हे कुटुंब हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वेलतुरा या गावचे आहे.

आई-वडील यांची इच्छा व आपली आवड यामुळे मी या संप्रदायाशी जोडला गेलो. मात्र, आता आयुष्यभर वैष्णवांची पताका खांद्यावर घेणार असल्याच्या भावना दैनिक प्रभातशी बोलतांना त्यांनी व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.