पुणे : टाळ-मृदंगाचा अखंड गजर त्या तालावर डौलणारे वारकरी मनी विठुयारायाची भेटीची आस सर्वत्र भक्तीचा दरवळ अन् या साऱ्याला लाभलेली ऊन-सावलीची साथसंगत अशा अत्यंत प्रसन्न वातावरणात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने बुधवारी सांयकाळी 6 च्या सुमारास पुण्यनगरीत प्रवेश केला आहे. वैष्णवांची मांदियाळी व विठुनामाच्या गजराने अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली आहे. पालखी सोहळ्यात टाळ-मृदंगाचा स्वर आणि झिम्मा फुगडीचे खेळ वारकरी सादर करत आहे.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालकीचा मुक्काम विठोबा मंदिर तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहेत. या पालखीसाठी ही दोन विठोबांची मंदिरे सजली असून स्वागतासाठी पुणे सज्ज झाले आहे.