पुणे- राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील 743 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणाला सोमवारी अंतिम मान्यता देऊन प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभाग रचना व आरक्षणाची माहिती तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून यामुळे आयोगाने ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षणास मान्यता देण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. 2 नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे आदेश आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
तालुकानिहाय निवडणुकीस पात्र ग्रामपंचायतींची संख्या
खेड -91, भोर – 73, शिरुर- 71, जुन्नर – 66, पुरंदर 66, इंदापूर-60, मावळ – 57, हवेली – 55, दौंड -50, बारामती 49, मुळशी – 45, वेल्हे -31, आंबेगाव – 29