#WarAgainstVirus: मुस्लिम समाजाने ईदमधील खर्च टाळून सुरू केला अतिदक्षता विभाग

जकात, सदका आणि इमदादची सुमारे ३६ लाख रुपयांची रक्कम आणली उपयोगात

मुंबई: कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची सुमारे ३६ लाख रुपयांची रक्कम #WarAgainstVirus साठी आणली उपयोगात. या रकमेतून १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरु केला.

कोरोना च्या संकटकाळात पवित्र रमजानईद दिवशी मुस्लिम समाजाने अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय. जात, पात, धर्माच्या पलिकडे जाऊन कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत असल्याचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.

इचलकरंजीमधील मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.