मुंबई – हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ऍक्शन पॅक्ड “वॉर’ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुपरफास्ट वेगाने सुरू आहे. 2 ऑक्टोबरला रिलीज झाल्यावर “वॉर’ने केवळ चारच दिवसांमध्ये 100 कोटींचा पल्ला पार केला होता.
#Poll: #War is set to hit ₹ 200 cr mark today [#Dussehra]… Will it make it to ₹ 300 cr Club, in view of its current terrific trending? #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) October 8, 2019
कालच्या रविवारी “वॉर’ने 35.5 ते 36 कोटी रुपयांची कमाई केली होती तर आतापर्यंत या सिनेमाने 200 कोटींची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे दिली होती. नेहमीपेक्षा शनिवारी 30 टक्के जास्ती कमाई झाली आहे, असे “बॉक्स ऑफिस इंडिया’ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. “वॉर’ची हिंदी आवृत्ती तब्बल 3800 थिएटरमधून रिलीज केली गेली आहे.
याशिवाय तमिळ आणि तेलगू भाषांमधील “वॉर’ची कमाई वेगळीच आहे. हे आकडे तर केवळ हिंदी “वॉर’चे आहेत. दरम्यान, हृतिक रोशन आणि टायगरचे स्टंट प्रेक्षकांना खूपच आवडले आहेत. या दोघांशिवाय आशुतोष राणा आणि वाणी कपूर हे देखील मुख्य भूमिकांमध्ये आहेत.