#CWC19 : भारताने मखलाशी केली – युनुस

लंडन – आमच्या संघास उपांत्य फेरीची संधी मिळू नये यासाठी भारताने इंग्लंडविरूद्धचा सामना हेतूपूर्वक गमावित मखलाशी केली. त्यांचे हे कृत्य अखिलाडूवृत्तीचे आहे असा आरोप पाकिस्तानचे ज्येष्ठ क्रिकेटपटू वकार युनुस यांनी केला आहे.

युनुस यांनी सांगितले की, इंग्लंडविरूद्ध भारतास विजयाची संधी होती. विजयासाठी 338 धावा करणे हे भारताच्या आवाक्‍यात होते. मात्र, त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी जाणीवपूरक संथ खेळ केला. आमचा संघ बाद फेरीत स्थान मिळविल. पण अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या भारताच्या खिलाडूवृत्तीची येथे परिक्षा होती व त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांनी असे कृत्य करीत स्वत:ची प्रतिष्ठाही धुळीस मिळविली आहे.

पाकिस्तानचे माजी खेळाडू बासित अली व सिकंदर बख्त यांनी इंग्लंडविरूद्ध भारत सामना गमावणार आहे असे भाकित या लढतीपूर्वी केले होते. इंग्लंडचे 10 गुण झाले असून अखेरच्या लढतीत त्यांची न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. पाकिस्तानचे नऊ गुण असून शेवटच्या सामन्यात त्यांच्यापुढे बांगलादेशचे आव्हान असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.