वानवडीही ‘सील’

वानवडी – वानवडी परिसरात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाने वानवडीचा भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वानवडीतील शांतीनगर येथील रहिवाशांनी एकत्र येत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी शांतीनगरमधील सर्व रस्ते बंद केले आहेत.

नागरिकांना मास्क वापरणे सक्तीचे असून नागरिकांचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवून हातावर सॅनिटायजर दिले जात आहेत. येथील अंबादास लगड, नीलेश निर्मळ, संजय शेलार, किशोर परदेशी, सुमन सुत्रावे, अजहर सय्यद, प्रसाद जाधव, नरेश कोंडय्या, विनोद ढसाळ, अनूप दीक्षित, बाबू यादव व इतर रहिवासी यासाठी पुढाकार घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.