हवी हवीशी बातमी ! सहा महिन्यानंतर देशात २० हजारांपेक्षाही कमी करोना रुग्ण

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीलाच करोनामुळे देशात प्रवेश केला आणि हळूहळू संपूर्ण देश व्यापून टाकला. मात्र, आता वर्षाच्या शेवटी देशातील करोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत आहे. त्यातच देशातील प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी बातमी आता समोर आली आहे. तब्ब्ल सहा महिन्यानंतर देशवासीयांना दिलासा मिळणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील २४ तासात २० हजारांपेक्षाही कमी करोना रुग्ण आढळून आले आहेत.

देशात मागील २४ तासांत १८ हजार ७३२ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात २४ तासांत २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ लाख ४७ हजार ६२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २ लाख ७८ हजार ६९० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जण करोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात २१ हजार ४३० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

राज्यात २ हजार ८५४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय १ हजार ५२६ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख १६ हजार २३६ वर पोहचली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९४.३४ टक्के इतका झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.