नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रो यांच्या अधिकृत अकाउंटवरील ट्विट चांगलेच चर्चेत आहे. या ट्विटला ट्विटर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. नेहमीच आपल्या हटके ट्विटमुळे सोशलवर त्यांचे ट्विट व्हायरल होत असतात. म्हणूनच त्यांचा क्रिएटीव्हीटीचं अनेकांनी कौतुक केले आहे. यातच आता दिल्ली मेट्रोचे पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
दरम्यान,एका प्रवाशाच्या प्रश्नावर दिल्ली मेट्रोनं दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रवाशांना ट्विटरवर टॅग करत मेट्रोबाबतची माहिती मागितली होती. या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते की,’Weekend ला मेट्रो सुरू राहाणार की बंद? कृपया नक्की सांगा. गर्लफ्रेंडला भेटायचं आहे, नाही भेटलो तर आमचं ब्रेकअप होईल.’ यावर मेट्रोने मजेशीर उत्तर दिलं आहे. ‘मेट्रो चालू है मेरे दोस्त, जा जी ले अपनी जिंदगी’.
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमातील ‘सिमरन जा जी ले अपनी जिंदगी’ हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता. याच स्टाईलमध्ये मेट्रोनं या तरुणाला उत्तर दिलं आहे. या ट्विटवर युजर्सद्वारे लाईक आणि कंमेंट्सचा वर्षाव होत आहे. हे मजेशीर उत्तर लोकांच्या भलतंच पसंतीस उतरत आहे