पिवळे दात चमकदार बनवायचे आहेत? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

दातांसंबंधी बरेच काही समज आणि काही गैरसमज त्याच्या मनात रेंगाळत असतात. त्याची चिंता वाढवत असतात. यातील गैरसमज दूर व्हावेत दातांविषयीची शास्त्रीय माहिती मिळावी म्हणून हा लेख…

लहान मुलामुलींना दुधाचे दात येण्याचं वय, दात येण्याचा क्रम, दातांची बळकटी, दातांचा रंग, त्यांचा सरळ-वाकडेपणा, टणकपणा इत्यादी सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्‍तीनुसार वेगवेगळ्या असतात. या बाबतीत आनुवांशिक गुणधर्मांचा प्रभाव प्रचंड असतो. त्यामुळे दात लवकर येण्याबद्दल किंवा उशिरा येण्याबद्दल काळजी न करणे चांगले असते.

दात येताना दुखतं, ताप येतो, जुलाब होतात, असं मानलं जातं. त्यामुळे दात येत असताना जेव्हा जुलाब होतात तेव्हा काही पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. जुलाबावर इलाज करणे टाळतात. मुलाला दात येताहेत म्हणून जुलाबावर उपचार करायचे नाहीत, हे चूक आहे.

दीड वर्षापर्यंत दुधाचे दात आल्यानंतर साधारणत: वयाच्या सहाव्या वर्षी सर्वात मागे एक दाढ येते. ती कायमच्या दातांपैकी असते. तिच्या आरोग्याकडं लक्ष द्यायला हवं.
अगदी अपवादात्मकरीत्या एखाद्या बाळाला जन्मत:च दात असतात. या दातांबद्दल खूप समज-गैरसमज आढळतात. अशा दातांमुळे पालकांनी घाबरून जाण्यासारखं काही नसतं. असे दात जर सैल असतील तर डॉक्‍टरांकडून काढून टाकलेले चांगले. यातील निम्म्या वेळा हे दात “जादा’ आलेले असतात. नंतर खरे दुधाचे दात येणार असतात.

सामान्यत: अन्य प्राण्यांचे दात सहसा किडलेले दिसत नाहीत. यामागचे कारण साखर आहे. कोणताही दात असलेला प्राणी साखर खात नाही. त्यामुळं त्याचे दात किडतही नाहीत. त्यामुळे गोड खाण्यावर नियंत्रण मिळवणे आणि गोड खाल्ल्यावर जाणीवपूर्वक दात स्वच्छ करणे गरजेचे ठरते. दातांची कीड रोखण्यासाठी फ्लुरॉईडयुक्‍त टूथपेस्टचा वापर करणेही हिताचे असते.
दात किडू द्यायचे नसतील, तर काही सवयींपासून बाळाला दूरच ठेवायला हवे. बाळाला दूध पाजत निजू देणं, तोंडात बाटली ठेवून बाळाला निजवणं इत्यादी. तसेच अंगठा किंवा बोटं चोखल्यानं किंवा चोखणी चोखल्यानं, समोरचे दात पुढं येण्याची शक्‍यता वाढते.
मुलं पुष्कळदा तोंडावर पडतात आणि दातांना इजा होते. यात दात वाकडा होणं, हिरडीत घुसणं, दात पडणं, मोडून तुकडा पडणं इत्यादी गोष्टी घडतात. अशावेळी थेट तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेतलेला बरा!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.