प्रकाश आंबेडकरांची चव्हाणांना थेट धमकी म्हणाले, बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?

नांदेड – ‘बायको सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा’ असा धमकी वजा टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना लगावला आहे. ते देगलूर येथील प्रचारसभेदरम्यान बोलत होते.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणूक असून या निमीत्ताने येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. यावेळी ‘आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का? अशी धमकीच प्रकाश आंबेडकर यांनी उघडपणे अशोक चव्हाणांना दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.