भूमीला कुणासोबत डेट करायचंय?

भूमि पेडणेकरचा करियर ग्राफ हा दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. तिचा सांड की आंख आणि बाला या चित्रपटानी तिकीटबारीवर चांगले यश मिळवले आहे. आता तिचा पती, पत्नी और वो हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाचा कळत न कळत परिणाम हा भूमिवरही झालेला दिसून येतो. आता भूमिची नजर प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनासवर आहे. ही गोष्ट भूमिनेच सांगितली आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत भूमिला प्रश्‍न विचारला की आपल्याला कोणाशी डेट करावेसे वाटते. तेव्हा तिने केवळ निक जोनासचे नाव घेतले होते. जर मला बॉलीवूडच्या एखाद्या नटीच्या नवऱ्याबरोबर किंवा बॉयफ्रेंडवर डेट करण्याची संधी मिळाली तर मला प्रियंकाचा नवरा निक जोनासला डेट करण्यास आवडेल. झालं, मग भूमि पेडणेकरबाबत गॉसिपला उधाण आले आहे. भूमि तुला “वो’ व्हायचे आहे.

चित्रपटात तर तू पत्नी झाली आहेस, मग जोनासबरोबर डेट करायचे कारण काय? तो आवडत असला तरी एका अभिनेत्रीचा नवरा आहे, हे विसरु नको, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे. अर्थात प्रियंका असताना आपल्याला “वो ‘ होणे सोपे जाणार नाही, हे तिला चांगलेच ठाऊक असेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.