अभिनेत्री दीपिका पदुकोणचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यामध्ये आता अभिनेता कार्तिक आर्यनचाही समावेश झाला आहे. कार्तिकने त्याला दीपिकाबद्दल वाटणारी भावना लपवून ठेवलेली नाही.
मला दीपिका पदुकोण सारख्या मुलीबरोबर लग्न करायला आवडेल असे त्याने इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये सांगितले.
बॉलीवूड हंगामाने लाइव्ह सेशन आयोजित केले होते. त्यामध्ये कार्तिकने त्याच्या चाहत्यांबरोबर संवाद साधला. तुला कुठल्या व्यक्तीबरोबर लग्न करायला आवडेल? असा प्रश्न कार्तिकला या सेशनमध्ये विचारण्यात आला. त्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता दीपिका पदुकोणचे नाव घेतले. मला दीपिकासारख्या मुलीबरोबर लग्न करायला आवडेल असे त्याने सांगितले.
दीपिका तिला नवऱ्याबद्दल वाटणारा अभिमान ती जाहीरपणे व्यक्त करते’ असे कार्तिकने सांगितले. कॅटरिना कैफ बरोबर काम कधी करणार असा प्रश्न जेव्हा त्याला विचारला तेव्हा सुद्धा कार्तिकच्या उत्तराच दीपिका पदुकोणचा उल्लेख होता.
दीपिका पदुकोणसोबत सुद्धा माझी जोडी चांगली दिसेल असे उत्तर त्याने दिले. यापूर्वी कार्तिक आणि दीपिकाने सोशल मीडियावरुन परस्परांची थट्टामस्करी केली होती. पती, पत्नी आणि वो चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी दीपिकाने कार्तिकला धीमे धीमे गाण्यावर नृत्याच्या स्टेप्स शिकवायला सांगितल्या होत्या. चाहते आणि फोटोग्राफर्ससाठी विमानतळावरच कार्तिक आणि दीपिकाने डान्सच्या काही स्टेप्स केल्या होत्या. त्याचेही मोठे फॅन फॉलोईँग आहे. कार्तिक आर्यनचे सारा अली खानबरोबर नाव जोडले जात होते. कार्तिक आर्यनने अल्पावधीत इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.