वाणी कपूरचा फॅन्सनी केला पाठलाग

सेलिब्रिटींना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल, काही सांगता येत नाही. असाच एक भन्नाट अनुभव ऍक्‍ट्रेस वाणी कपूरला काही दिवसांपूर्वी आला. एका फॅनने तिच्या कारचा पाठलाग करायला सुरूवात केली. थोड्या वेळाने वाणीच्या लक्षात ही बाब आली आणि तिने आपल्या ड्रायव्हरला कार वेगाने चालवण्याची सूचना केली. थोड्यावेळासाठी त्या बाईकवरचा फॅन मागे पडला होता. त्यामुळे वाणीला थोडेसे हायसे वाटले. पण हा बाईकवर स्वार झालेला फॅनही वेगाने तिचा पाठलाग करायला लागल्याचे जेंव्हा तिला दिसले, तेंव्हा तिचे धाबे दणाणले. त्याला कोणत्याही परिस्थितीत वाणीला भेटायचे आणि तिच्याशी बोलायचेच होते. जेंव्हा कार वर्सोवा भागात पोहोचली, तेंव्हा वाणीला जरा जास्तच भीती वाटायला लागली. कारचा पाठलाग करत करत हा बाईकवरचा वेडा घरापर्यंत येऊन पोहोचेल असे वाणीला वाटले. म्हणून घाबरलेल्या वाणी कपूरला चक्क वर्सोवा पोलिस ठाणे गाठले आणि बाईकस्वाराविरोधात तक्रार नोंदवली, थोड्या वेळाने ती आपल्या घरी सुरक्षितपणे पोहोचली. या फॅनचे नाव समीर खान होते. पण त्याच्यावर पोलिसांनी काही कारवाई केली की नाही हे समजले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.