नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माला मागच्या वर्षीच्या जानेवारीत कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्याच्या छोट्या वामिकाला पाहण्यासाठी चाहते खूपच उत्साही असतात. वामिकाचा जन्म झाल्यापासून विराट-अनुष्काने तिला मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, विराटने फोटोग्राफर्सना बाळाचे फोटो काढू नका अशी विनंतीही केली होती.
Pic of the day 😍😍#Vamika #ViratKohli pic.twitter.com/VRcTgzs9pd
— Mayank Raj (@ImMayank1616) January 23, 2022
अश्यातच आता वामिकाची एक झलक समोर आली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला अखेरचा वन-डे सामना केप टाऊनच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात सूर गवसला. याचसोबत अर्धशतकी खेळी केल्यानंतर विराटने पहिल्यांदाच आपली मुलगी वामिकाच्या साथीने सेलिब्रेट केलं. आणि याच वेळी वामिका कॅमेऱ्यात कैद झाली.
What A Adorable Moment ✨😍
First Glimpse of Baby Vamika ❤#Vamika #ViratKohli pic.twitter.com/dGZQzS942F
— Sourabh🕸 (@xZx__slipknot) January 23, 2022
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अभिनेत्री अनुष्का शर्माने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून, चिमुरड्या वामिकाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. गुलाबी रंगाच्या या ड्रेस मध्ये वामिका खूप क्यूट दिसत आहे. तिचे केसांचे लाल रिबीनने पोनीटेल बांधली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, विराट-अनुष्काच्या फॅन्सने व्हिडिओवर लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव केला आहे.