सातारा (प्रतिनिधी) – नेत्रदान पंधरवड्यानिमित्त येथील जिल्हा रुग्णालयात वॉक फॉर आय डोनेशन अर्थात एक पाऊल नेत्रदानासाठी या संकल्पनेतून वाकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
या वाकेथॉनमध्ये साधारण 350 सातारकरांनी आपला सहभाग नोंदवला. शहरातील अनेक डॉक्टर्स, सामाजिक संस्था, स्पोर्ट ग्रुप व इतर अनेक सातारकरांनी यामध्ये भाग घेतला.
वाकेथॉनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
या वॉकेथॉनची सुरुवात जिल्हा रुग्णालय येथून होऊन खालच्या रस्त्याने शेटे चौक व तिथून परत जिल्हा रुग्णालय सातारा येथे सांगता झाली.
याप्रसंगी उद्घाटन कार्यक्रमांमध्ये याशनी नागराजन यांनी सर्व उपस्थित लोकांचे कौतुक केले. तसेच जिल्हा रुग्णालयातील नेत्रदानासंबंधी होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी नेत्रदान विषयी माहिती दिली व अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी पुढे यावे असे आवाहनही या निमित्ताने उपस्थितांना केले.डॉ. सुजाता राजमाने यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. सुभाष कदम, डॉ. प्रिया मेश्राम, डॉ. अरुंधती कदम, डॉ. संजीवनी शिंदे, डॉ. पूनम लाहोटी, नेत्र चिकित्सा अधिकारी शिंदे , नायकवडी श्री कांबळे , पाटोळे, जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.