मुंबई- अभिनेत्री रिंकू राजगुरुची सध्या लंडनवारी सुरु आहे. छू मंतर या चित्रपटाचं शुटींग सध्या लंडनमध्ये सुरु आहे. त्यासाठी रिंकू लंडनला पोहोचली आहे. लंडनमधील एक साडीतील व्हीडियो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे
रिंकू सोशल मीडियावर सध्या प्रचंड सक्रिय असते. लंडनमधील शुटींगचे अनेक फोटो, व्हीडियो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच तिने साडी नेसून रस्त्यांवर कॅटवॉक करताना ती दिसते आहे.
तुमचा अदृश्य मुकुट नेहमी परिधान करा, अशा आशयाचं कॅप्शन तिने दिले आहे. या साडीत ती नेहमीप्रमाणे ग्लॅमरस दिसते आहे. या चित्रपटात तिच्या बरोबर प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी झळकणार आहे.
दरम्यान, रिंकूचा हा अंदाज चाहत्यांसाठी नवीन आहे. या आधी 100 या वेबसीरीजमध्ये साकारलेल्या बिनधास्त भूमिकेला अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात रिंकूने फिटनेसकडे प्रकर्षाने लक्ष दिलं होतं.