उलटे चाला; फिट राहा

नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक हृदय दिनानिमित्त पुण्यात बॅक-ए-थॉन-पूश बॅक हार्ट डिसिजेस हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आरोग्यपूर्ण हृदयासाठी बॅक-ए-थॉनमध्ये हजारो पुणेकरांनी आरोग्य रक्षणासाठी एका वेगळ्या मोहिमेचा आनंद घेतला.

सेनापती बापट मार्गावर बॅक-ए-थॉनला सुरूवात झाली आणि मॉडेल कॉलनीच्या धोत्रे चौकात हा उपक्रम संपला. हा वॉक साधारण दीड किलोमीटरपर्यंत आयोजित करण्यात आला. पुण्यातल्या सामान्य लोकांमध्ये हृदय रोगांबाबत जागरुकता पसरवण्यासाठी व त्याला सहाय्य करण्यासाठीचे हे एक उदाहरण पुढे आले असून, यासाठी साधारण 150 नागरिकांनी सहभाग घेतला होता. स

र्वच वयोगटात कार्डिओव्हॅस्क्‍युलर आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. यंदाच्या जागतिक हृदय दिनानिमित्तची थीम आहे, “माय हार्ट, यूवर हार्ट’ आणि, बॅक-ए-थॉनच्या माध्यमातून, लोकांना आरोग्यपूर्ण हृदयासाठी व आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी प्रोत्साहन देण्याचा एक प्रयत्न करण्यात आला.

पुढे चालण्यापेक्षा मागच्या दिशेने चालत गेल्याने आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आणि परिणामी आपल्या कॅलरीज जास्त जळतात व चांगला कार्डिओव्हॅस्क्‍युलर व्यायाम होतो.

मागच्या दिशेने चालत गेल्याने पाठदुखी कमी होत असून शरीराची लवचिकता वाढते, चरबी अधिक जळते आणि पारंपरिक चालण्यापेक्षा कॅलरीजसुद्धा अधिक जळतात. तसेच, शरीराचे संतुलन सुधारते, विचारक्षमता आणि दृष्टीही सुधारते, असे दिसून आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.