वाकेश्‍वरला पोटनिवडणुकीत सत्ताधारी गटाला “दे धक्का’

वडूज – खटाव तालुक्‍यातील वाकेश्‍वर (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी गटाला धक्का देत विरोधी ज्योतभैरव आघाडीच्या उमेदवारास मताधिक्‍याने निवडून दिले.
वाकेश्‍वर येथील वार्ड क्र. 2 मधील इतर मागास प्रवर्गातील सागर गोरख कुंभार यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली होती. या ठिकाणी सत्ताधारी आघाडीचे संदीप शिवाजी दळवी व विरोधी ज्योतभैरव आघाडीचे रुपेश मच्छिंद्र मदने यांच्यामध्ये सरळ लढत झाली. यामध्ये विरोधी आघाडीचे रुपेश मदने यांना 228 मते मिळवून विजयी झाले. श्री. दळवी यांना 161 मते मिळाली. तर 3 मतदारांनी नोटा ला मतदान दिले. श्री. दळवी हे सरपंच सौ. ज्योती दळवी यांचे पती असल्या कारणाने या निवडणुकीकडे परिसराचे लक्ष लागले होते.

सातेवाडी येथील बबलू उर्फ युवराज बबन बोटे यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली. या ठिकाणी सत्ताधारी गटाचे आनंदराव हराळे व विरोधी आघाडीचे विकास बोटे असा दुरंगी चुरशीची लढत झाली. यामध्ये हराळे यांना 148 तर बोटे यांना 144 मते मिळाली. केवळ 4 मताच्या फरकाने हराळे यांचा विजय झाला. वाकेश्‍वर येथील विजयी उमेदवार मदने यांच्या निवडीनंतर गुलाल, फटाक्‍यांची आतषबाजी करण्याबरोबर त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डॉ. राजेंद्र फडतरे, नामदेव फडतरे, दत्तात्रय फडतरे, हणमंत फडतरे, संतोष काळे, शंकरराव फडतरे, आनंदराव फडतरे, पंढरीनाथ खुळे, कृष्णरात तुपे, विलास फडतरे, किरण जाधव, सुरज भांडवलकर, युवराज फडतरे, तुकाराम चव्हाण, विजय फडतरे, सुभाष फडतरे, अमित फडतरे, श्री. मदने, श्री. पाटोळे, श्री. जाधव यांच्यासह क्रांतिवीर उमाजी नाईक तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूकीनंतर ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर छोटेखानी आभार प्रदर्शन सभा झाली. धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.