मुंबई – बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील ‘वाजिद खान’ यांचं मुंबईतील चेंबूर रुग्णालयात निधन झालं. वाजिद खानच्या निधनाला काही दिवस उलटले असताना नुकताच त्याच्या कुटुंबियांनी एक मोठा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
ज्यामध्ये वाजिद खान ज्या रुग्णालयात उपचार घेत होता तिथल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. कुटुंबियांनी सांगितले की वाजिदचा मृत्यू किडनी संसर्गामुळे नाही तर कार्डियक अरेस्टमुळे झाला आहे. वाजिदचे निधन १ जून रोजी झाले होते. आता त्याच्या निधनाचे खरे कारण समोर आले आहे.
वाजिद खानच्या कुटुंबियांनी सांगितले की, ‘आपले प्रिय वाजिद खान यांनी वयाच्या ४७व्या अखेरचा श्वास घेतला. १ जून रोजी कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. मुंबईच्या सुराना सेतिया रुग्णालयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या वर्षी यशस्वीरित्या त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया पार पडली होती. त्यांनंतर घश्याचा संसर्ग बळावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.’