fbpx

कोरोनाचा ‘हाहाकार’! दिल्लीत स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी ‘वेटिंग’

नवी दिल्ली – देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर कोविड रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे. आता मृत्यूची संख्या 1.32 लाखांवर पोहोचली आहे. देशातील करोनाचा मृत्यू दर 1.47 टक्‍क्‍यांच्या जवळपास आहे.

केवळ राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 15 दिवसांत दिल्लीत सुमारे 1400 नागरिक मरण पावले आहेत. दिल्लीच्या रूग्णालयात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग आहे.

दिल्लीत नवीन प्रकरणे आणि मृत्यूची संख्या वाढली आहे. साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे. पण कोविड च्या वाढत्या घटनांकडे पाहता असे दिसते की बऱ्याच राज्यांत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

दिल्लीमध्ये करोना शिवाय इतर आजारांमुळे देखील मृत्यू होत आहे. हार्टअटॅक, उच्च रक्तदाब, टीबी आणि कॅंसर सारख्या रोगांमुळे जीव गमवणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोना पेक्षा पाच पटीने अधिक आहे. दिल्लीत स्मशानघाटावर 100 हून अधिक मृतदेह येत आहेत. 20 लोकांचा करोनामुळे मृत्यू होत आहे तर 80 जणांचा इतर रोगांमुळे मृत्यू होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे.

स्मशान घाटावर काम करणारे लोकं म्हणतात की, गेल्या पंधरा ते वीस वर्षात इतक्‍या मोठ्या प्रमाणात मृतदेह कधीच आले नव्हते. दुसरीकडे प्रदुषणाची भर पडल्याने लोकांना याचा त्रास होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.