आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले मत
नवी दिल्ली : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागणार आहे. या खटल्याची सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग 40 दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 16 ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विटवरुन या खटल्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.
I will not await this verdict with apprehension. I will pray for a judgement that makes us an even stronger and more united country… https://t.co/DngpHWk8Ua
— anand mahindra (@anandmahindra) November 8, 2019
ट्विटरसारख्या माध्यमांवर कायम ऍक्व्ह्ी असणाऱ्या महिंद्रा यांनी या खटल्याचा निकाल भारताला मजबूत करणारा असावा असे मत व्यक्त केले आहे. मला या निकालाची अती जास्त काळजी नाही. पण मी एका अशा निर्णयासाठी प्रार्थना करेन जो आम्हाला एक देश म्हणून आणखी मजबूत आणि एकत्र करण्यास मदत करेल, असे ट्विट केले आहे.
दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदींनीही या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. हा निकाल म्हणजे कोणाचा विजय किंवा पराभव नाही, निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. संघ परिवार तसेच, मुस्लीम संघटनांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि निकालाचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडयात बैठकाही झाल्या होत्या.