स्पेनमध्ये हाहाकार! गेल्या २४ तासांत कोरोनाचे सर्वाधिक बळी

स्पेन – संपूर्ण जगावर कोरोना संकटाचे ढग अधिकाधिक गडद होताना दिसत आहेत. सर्वप्रथम चीनमध्ये सापडलेला हा विषाणू आता युरोपात मृत्यूचे तांडव घालत आहे. प्रगत मानल्या जाणाऱ्या अमेरिका, इटली, ब्रिटन, स्पेन यांसारख्या देशामध्ये कोरोना सध्या हाहाकार माजवत असून येथील आरोग्य व्यवस्था मोडकळीस आल्या आहेत. अशातच आज स्पेनमधून आणखी एक दुःखद बातमी आली आहे. कोरोनाच्या या महाभयंकर विषाणूने २४ तासांमध्ये घेतलेल्या बळींचा नवा दुर्दैवी विक्रम आज स्पेनमध्ये घडला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये स्पेनमधील ८३८ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या ८३८ बळींसह देशातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता ६५२८ वर जाऊन पोहचली आहे.  स्पेनव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये देखील कोरोनाच्या बळींमध्ये वाढ होताना दिसत असून आजच्या नव्या आकडेवारीनुसार मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २०९ ने वाढून १२२८ वर पोहचलीये.

कोरोना संकटाला अटकाव करण्यासाठी जगभरातून प्रयत्न करण्यात येत असले तरी अद्याप कोरोनावर कोणतेही औषध अथवा प्रतिबंधात्मक लस शोधण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आलेलं नाहीये. तूर्तास नागरिकांनी घरांमध्येच राहून इतरांशी संपर्क तोडल्यास या विषाणूच्या प्रसाराची साखळी खंडित करता येऊ शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.