वाई रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांचे कार्य आदर्शवत

धनंजय घोडके

वाई – रोटरी क्‍लब ऑफ वाईचे अध्यक्ष- प्रमोद शिंदे 2018-19 चे अध्यक्ष होणार असे 2017-18 चे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घोरपडे यांनी डिस्ट्रीक्‍टला कळविले आणि माझ्या मनामध्ये आपल्या वर्षात नवीन काहीतरी करायचे हा विचार करायला सुरुवात झाली, आणि क्‍लब सचिव म्हणून कोणाला घ्यावयाचे अशी चर्चा क्‍लबमध्ये सुरु झाली. आणि मी नवीन मेंबर अजित क्षीरसागर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांच्या शिफारस करून नेमणूक करण्यात आली, आम्ही तरुण पदाधिकाऱ्यांनी काहीतरी वेगळे करण्याच्या इराद्याने वाई रोटरी क्‍लबची जबाबदारी स्वकारली.

त्यानंतर नाव आले क्‍लब ट्रेनर महत्त्वाचे पद ज्यांच्या ट्रेनिंगमुळे आम्हा सर्वांना रोटरीच्या कामामध्ये क्वालिटी काम होणार होते. त्यासाठी आम्ही क्‍लबमधील सिनियर मेंबर तसेच डिस्ट्रीक्‍टमध्ये अनेक पदावर केलेल्या कामाचा अनुभव असणाऱ्या श्रीमती स्वाती हेरकळ यांना क्‍लब ट्रेनर केले. खजिनदार म्हणून ज्यांना रोटरीमध्ये खुप अनुभव आहे असे मदन पोरे यांना निवडले. अतिशय अनुभवी व तरुण बोर्ड ऑफ डायरेक्‍टर तयार झाले.

माझी नाशिक येथील पेट सेट पूर्ण झाली तेव्हा लक्षात आले या वर्षीचे डी. जी. विष्णु मोंढे यांना यावर्षी वेगळे काहीतरी करायचे आहे आणि आम्ही पण काहीतरी वेगळे करायचे ठरविले आणि त्या पेट सेट मध्ये क्‍लबने 25 हॅप्पी स्कुल करणार असे सांगितले आणि 113 क्‍लब मधुन रोटरी क्‍लब वाईला पहिले बक्षिस मिळाले. तेथून आमची जबाबदारी वाढली आणि आम्ही कामाला लागलो. एक जुलैला वर्ष सुरु झाले आणि 7 जुलैला पदग्रहण समारंभ घेतला. वेगळे करयचे होतेच मग काय? सिनियर रोटरीयन श्रीमती स्वाती हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी माजी इंटरनॅशनल डायरेक्‍टर-शेखर मेहता हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि सर्व रोटरीयनच्या मदतीने कार्यक्रम थाटामाटात साजरा झाला. 44 वर्षामध्ये वाई क्‍लब मध्ये पहिल्यांदाच आर आय डायरेक्‍टर क्‍लब मध्ये आले होते त्याचा आनंद सर्वांना होता.

छोटे प्रकल्प करायचे नाहीत मोठे प्रकल्प करयचे असे ठरवून कामाला लागलो आणि आजपर्यंत 25 हॅप्पी स्कुल पूर्ण केल्या त्याचा मला खुप आनंद होत आहे. या हॅप्पी स्कुल मध्ये स्वच्छतागृह बांधुन दिले, खेळाचे साहित्य दिले, लेझीम, डिजिटल क्‍लासरूम, टॅब, मिनी सायन्स सेंटर, सोलर, वॉटर प्युरीफायर, 25000 पुस्तके, लायब्ररी कपाट अशा अनेक गोष्टी देऊन पूर्ण केल्या. हॅप्पी स्कुल करायचे ठरविले आणि खरे काकांनी 51000 ची मदत केली आणि आमचा उत्साह वाढला. आरंभ ट्रस्ट यासाठी धावून आले. लुल्ला फाउंडेशन, मुंबई येथील राजीव मेहता आणि डीजी विष्णु मोंढे यांनी स्वतः यासाठी आम्हाला मदत केली. त्यामुळे ही हॅप्पी स्कुल पूर्ण होऊ शकली. तसेच 25 इको स्कुल केल्या. यामुळे प्रत्येक शाळेमध्ये पालेभाज्याची रोपे व वेलझाडे बिया दिल्या. 25 प्राथमिक शाळेमध्ये 150 डिजिटल टॅब दिले. शाळेमध्ये प्रोजेक्‍टर स्क्रीन, कॉम्पुटर देऊन डिजिटल क्‍लासरूम केल्या.

25 शिक्षकांना आम्ही नेशन बिल्डर ऍवार्ड देऊन सन्मानित केले. या प्रकल्पावर आम्ही खुप काम केले. यासाठी मदनकुमार साळवेकर यांची खुप मदत झाली. पीजीडीईईएस चा कोर्स रोटरीच्या माध्यमातुन सुरभि कॉम्पुटरमध्ये घेतला, यासाठी 250 शिक्षकांनी भाग घेतला अनेक शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यात आले.

यासाठी माननीय राम ताकवले, सुहास तांबे, महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त-विशाल सोळंकी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी- कैलास शिंदे आणि पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी-कमलाकांत म्हेत्रे, लागीर झाल झी चे टीव्ही फेम कलाकार अश्‍या अनेक मान्यवरांनी स्वतः कार्यक्रमाला येऊन आमचा उत्साह वाढवला. अनेक मेडिकल कॅम्प घेतले. यासाठी डॉ. प्रेरणा ढोबळे, दिपक बागडे, डॉ. नीलम भोसले, डॉ. जयश्री जगताप, डॉ. दत्तात्रय घोरपडे, डॉ. रुपाली अभ्यंकर, डॉ. शंतनू अभ्यंकर अशा अनेक रोटरीयन डॉक्‍टरांची मदत झाली.

ग्लोबल ग्रॅट समिट वाई रोटरी क्‍लबने पाचगणी येथे आयोजित केली होती. कॉप्स मीटिंग घेतली, गणेश सजावट स्पर्धा घेऊन या कार्यक्रमात खेळाडूंसाठी तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, आणि रोटरी क्‍लब वाईमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातुन रोटरीचे काम लोकापर्यंत पोहचवले. अन्नपूर्णा योजना प्रकल्प आमचा उत्तम चालू आहे.

या प्रकल्पाची खरे काका याच्याकडे सर्व जबाबदारी आहे. श्रीमती स्वाती हेरकळ यांच्या चिकाटीमुळे आणि त्यांच्या कामामुळे 53 लाखांच्या दोन ग्लोबल ग्रॅट पूर्ण केल्या. यासाठी सर्व रोटरी मेंबरांची खुप मोलाचे मदत झाली. त्यामुळे हे शक्‍य होऊ शकले. स्वच्छेथॉन या प्रकल्पाच्या माध्यमातुन वाई मधील प्रत्येक रविवारी एक वार्ड स्वच्छ करून हा प्रकल्प राबवला. यासाठी एकलव्य वसतिगृहातील मुलांचे खुप सहकार्य मिळाले. किशोरी विकास रायला आम्ही 15 शाळेंमध्ये घेतले. यासाठी सुरभि कॉम्पुटरच्या विद्यार्थ्यांनी रोटरॅक्‍ट क्‍लबच्या माध्यमातुन हे रायले पूर्ण केले. हे सर्व प्रकल्प करत असताना सर्व रोटरी मेंबरचे सहकार्य लाभलेच पण विशेषतः स्वाती हेरकळ यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

खरे सांगायचे तर 2018-19 या वर्षात माझ्या कारकिर्दीत एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचे अनेक प्रकल्प ग्रामीण भागातील शाळेत, गावांत लोकांसाठी राबविण्यात आले आहेत. सर्व प्रकल्पाची माहिती सांगितली तर हे बुलेटीन पुरणार नाही पण थोडक्‍यात या वर्षाचा कामाचा आढावा मांडला आहे आणि या वर्षी काम करत असताना माझी पत्नी सोनाली शिंदे ही रोटरीयन आहे आणि ती पास्ट प्रेसिडेंट आहे. ती 2015-16 ला अध्यक्ष होऊन गेली. त्यामुळे तिचा अनुभव आणि काम करत असताना पाठीशी उभी राहुन तिने केलेल्या सहकार्यामुळे हे शक्‍य झाले आहे.

रोटरी क्‍लबचे डी जी विष्णु मोंढे यांनी वेळोवेळी केलेली मदत, आमचे पेट सेटच्या माध्यमातुन घेतलेले ट्रेनिंग अशा अनेक गोष्टीत त्यांनी केलेली मदत यामुळे हे सर्व प्रकल्प पूर्ण होऊ शकले. आणि आमच्या क्‍लबचे एजी आमचे मित्र दिलीप प्रभुणे यांनी आम्हाला वर्षभर खुप सहकार्य केले त्यांनी प्रकल्प करत असताना माहिती दिली, या वर्षी रोटरीला राज्यस्तरीय बक्षिसांचा पाऊस पडला असून प्रत्येक विभागवार वाई रोटरीला बक्षीस मिळाली आहेत. सर्वांचे मी खुप खुप आभारी आहे, वाई रोटरी क्‍लबला असेच सहकार्य राहू द्यात एवडीच अपेक्षा………!

Leave A Reply

Your email address will not be published.