माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेला कोर्टात चक्कर

सातारा ( प्रतिनिधी ) – वाई हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान यावर सुनावणी गुरुवारी (दि.२१) सुरू असताना यातील माफीचा साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिला अचानक चक्कर आल्याने काही काळ गोंधळाची अवस्था झाली. यानंतर कोर्टाने तब्येतीची विचारपूस करून १० मिनिटांचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू केली.

डॉ. संतोष पोळ याने वाई शहरासह परिसरातील अनेकांचा खून केला. खून केल्यानंतर त्याने सहा मृतदेह धोम धरणालगत असलेल्या फार्म हाऊसमध्ये पुरून ठेवले. शेवटचा खून मंगल जेधे या महिलेचा केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्या नंतर डॉ. संतोष पोळ यांना अटक केली. ज्योती माफीची साक्षीदार झाली व डॉ. पोळ याने कशा पद्धतीने हत्याकांड केला याचा पाढा वाचला

सातारा जिल्हा न्यायालयात सध्या याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. दरम्यान ज्योती मांढरे न्यायालयात असताना तिला अचानक चक्कर आली.

ज्योतीला पाणी देऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आले. कोर्टाने १० मिनिटांचा ब्रेक घेत ज्योतीने पुन्हा ठीक असल्याचे सांगितल्यानंतर कोर्ट कामकाजाला सुरुवात झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.