वाघोली – हवेली तालुक्यातील महावितरणच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी महावितरण व नागरिक यामधील दुवा म्हणून कार्य करणार असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे , शंकर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित करणार असल्याची माहिती महावितरणच्या शासकीय समिती सदस्य प्रदीप वसंत कंद यांनी दिली आहे.
नियुक्तीनंतर कंद यांनी महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध महावितरणचे समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी वाडेबोल्हाई- पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या समस्यांचे निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांना देण्यात आले.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे उपस्थित होते. हवेलीच्या पूर्व भागातील महावितरण च्या समस्या तातडीने सोडणार भर देणार असल्याचे प्रदीप वसंत कंद सांगितले.