वाघोली – भारतीय जनता युवा माेर्चा पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनात ‘विद्यापीठ विधेयक’ पारीत करुन घेतले. वाघोली येथील भारतीय जैन संघटना महाविद्यालय व कॉलेज या ठिकाणी कायद्यातील पूर्वीची तरतूद आणि पारित करून घेतलेल्या विधेयका मुळे होणारे परिणाम दर्शवणारे फ्लेक्स लावून निषेध आणि जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी भाजयुमाे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदिप सातव , जिल्हा उपाध्यक्ष उमेश मोरे , गणेश सातव , तालुका सरचिटणीस गौरव झुरूंगे , उपाध्यक्ष सचिन हरगुडे , राहुल कुटे विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष ओमकार कंद, तालुका सरचिटणीस विजय जाचक,ग्रामपंचायत सदस्य विशाल हरगुडे, युवा वॉरियर चे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश हरगुडे, मिनार जगताप, गौरव सातव , सुमित सातव , किरण कड , अक्षय हरगुडे उपस्थित होते.