वाघोली : वाघोली तालुका हवेली येथे आय व्ही इस्टेट सांस्कृतिक संस्थेच्या वतीने रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राम कथा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आय व्ही इस्टेट सांस्कृतिक संस्था वाघोली सालाबाद प्रमाणे नवीन वर्षाची सुरवात एका धार्मिक कथेने करत असते. कोरोना कालखंडा नंतर राममंदिराच्या प्रथम वाढ़दिवसाचे अवचित्त साधून संस्थेने आपला सातवा वार्षिक कार्यक्रम रामकथा 4 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत रोज संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत सुनिश्चित केलेला होता.
त्यासाठी लखनऊहून कथा प्रस्तुती साठी श्री संत रमेश भाई शुक्ला महाराज यांना आमंत्रित केलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात कलश यात्रेने झाली. श्री संत रमेश भाई शुक्ला महाराज यांनी आपल्या सुस्पष्ट अमृतवाणी आणि तालबद्ध भजन,रामायण चौपाईने रोज येणाऱ्या 1000 ते 1200 श्रोत्याना 9 दिवस मंत्र मुग्ध केले. राम कथा श्रवणाचा आलेला आनंद प्रत्येक आयव्ही इस्टेट करांसोबत वाघोली करांच्या सुद्धा चेहऱ्यावर प्रत्यक्षपणे दिसून येत होता.
कार्यक्रम अति उत्तम व्हावा यासाठी संस्थेच्या 19 सभासदांनी गेल्या 3 महिन्या पासून कंबर कसलेली होती. मार्गदर्शक आधारस्तंभ रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य ) आधारवड म्हूणन खंबीर पणे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमा प्रमाणे याही कार्यक्रमास साथ दिली. संस्थेने दररोज हजार पेक्षा जास्त श्रोत्यांच्या प्रसादाची व्यवस्था केलेली होती.
दरम्यानच्या कार्यक्रमाला रामभाऊ दाभाडे, महेंद्र भाडळे,समीर भाडळे, प्रमोद भाडळे, राजेंद्र अण्णा सातव, जयश्री राजेंद्र सातव, राजेंद्र भाडळे,जयप्रकाश सातव, संदीप शिंदे, विजय जाचक, अनील सातव, शिवदास पवार, आयव्ही फेडरेशन, अपार्टमेंट व्हीला , उमंग आणि प्रायमो, प्रीमियर, बोटानिका, निया, साई द्वारका,ओर्चीड, सोनचाफा, गुलमोहोर, अंशुल या सर्व सोसायटीचे कार्यकारी अधिकारी यांनी आरतीला उपस्थित राहून कार्यक्रमाला दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी जवळ पास 3000 नागरिक उपस्थित होते.