वाघोली : ओबीसी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध – ईश्‍वर बाळबुधे

वाघोली – ओबीसी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी केले. पुणे येथील कार्यालयात पुणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल आढावा व ओबीसी आरक्षण चिंतन बैठक पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळबुधे बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष  प्रदिपदादा गारटकर, पुणे शहराध्यक्ष  प्रशांतजी जगताप, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक सतिश दरेकर, पुणे शहराध्यक्ष संतोषजी नांगरे,  ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष  शिवदास उबाळे, कार्याध्यक्ष  नितिनजी शेंडे, कार्याध्यक्ष अतुलजी राऊत यांच्या  प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याची समस्या जाणुन घेतली, पक्ष संघटनात्मक चर्चा केली व नविन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. ओबीसींच्या जनगणनेची मागणी व आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरविण्यात आली व येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रदेशाध्यक्ष  ईश्वरजी बाळबुधे यांनी दिला. पुणे जिल्हाध्यक्ष  प्रदिपदादा गारटकर यांनी ओबीसी सेल च्या चांगल्या कामाचे कौतुक केले व लागेल ती मदत पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केली जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजश्रीताई भगत, संतोषजी भाकरे, वाघोली गावच्या सरपंच वसुंधरा उबाळे, गायकवाड ताई,  झुरंगेताई, पुणे समता परिषद अध्यक्ष प्रदीप घुमे, पुणे ग्रामीण ओबीसी सेल उपाध्यक्ष चंद्रशेखर परंडवाल, सविता मंचरे, विजय शिंदे, तालुकाध्यक्ष तुकाराम करे, रविंद्र गायकवाड, दादाराम झगडे, सचीन शिंदे, मंगेश खैरे, सोमनाथ भुजबळ, गोविंदराव वाव्हळ, सुभाष टिळेकर, दत्ता बिरदवडे, बाळासाहेब झोरे, सोमनाथ भुजबळ, महेश थेडगे, विकास गडधे, किरण गदादे, सोमनाथ धोंगडे, सचिन कुंभार, मयुर गुरव, बंटी वाघवले, राहुल भोंगळे, जगन्नाथ बरकडे, राजेंद्र गोरे, प्रशांत झोडगे, सुहास भुजबळ, शुभम जाधव, विकास चौधरी, बाळासाहेब काजळे, बाळासाहेब खंडागळे, भाऊ सुतार, विकास कंद, सोमनाथ खोल्लम, भाऊसाहेब कुंभार, लक्ष्मण कुंभार, प्रतीक सुपेकर, सोहम कुंभार, मिनाज शेख, ओंकार भोजने, अक्षय बेल्हेकर, विनय लवांगरे, गणेश झरेकर, अभिजीत सुतार, अक्षय बेल्हेकर, अक्षय पावसकर, स्वप्नील रायरीकर, प्रथमेश घाग, प्रणव पटेकर, राहील तांबोळी, आशिष भालेराव, ओमकार निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.