वाघोली : उबाळेनगरमध्ये कोरोनाचा शिरकाव

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली येथील उबाळेनगर परिसरातील लेनमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून ३० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदरचा व्यक्ती एकटाच राहत असून त्याला ताप जाणवू लागल्याने वाघोलीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट करण्यात आली. टेस्टचा रिपोर्ट शुक्रवारी (दि.२९) दुपारी पॉजिटीव्ह आला आहे.

या व्यक्तीच्या घर परिसरामध्ये तत्काळ ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली असून वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्याला वाघोली येथील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आयुर्वेदिक कॉलेजमध्ये वाघोलीचा पहिलाच रुग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे. वाघोलीमध्ये आत्तापर्यंत १५ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले असून यापैकी १० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ५ जणांवर उपचार सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.