कोरोना रुग्णांचा आकडा २५ वर पोहचला
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली-केसनंद रोडवरील काळूबाईनगर परिसरातील ६५ वर्षाच्या वृद्धाला तर बालाजी पार्क परिसरातील ८ वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे. दोन्ही ठिकाणी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे. वाघोली प्राथमिक केंद्राच्या वतीने परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. वाघोली-केसनंद रोडवरील परिसरामध्ये आत्तापर्यंत ५ रुग्ण सापडले आहेत यापैकी २ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ३ अॅक्टीव आहेत.
वाघोलीमध्ये आत्तापर्यंत २५ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, यापैकी १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ७ कोरोनाचे रुग्ण अॅकटीव आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येत असून नागरिकांनी विनाकारण गर्दी करून नये, मास्क वापरावे, सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायजरचा वापर करावा, दुकानदारांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मास्क न घालणाऱ्या ५० जणांवर दंडात्मक कारवाई
वाघोली परिसरामध्ये मास्क न घालणाऱ्या ५० जणांवर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दोन दिवसात केलेल्या कारवाईत त्यांच्या कडून १०० रुपये प्रत्येकी दंड वसूल करण्यात आला आहे.