वाघोली (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वाघोली (ता. हवेली) येथील पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष गणेश बाळासाहेब सातव पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. दरम्यान, वाघोली येथील सातव यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीच्या युवा संघटनेला मोठा धक्का दिल्याची चर्चा जिल्हाभर होऊ लागली आहे.
ठाणे येथील हॉटेल टीप टॉप या ठिकाणी हा प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, युवा उद्योजक बाजीराव चव्हाण, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार शरद सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
युवा नेते गणेश सातव पाटील यांचा भव्य दिव्य ढोलताशांच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला.
Maharashtra : ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री शिंदे
बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढवण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मोठे प्रयत्न करत आहेत. पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करणार असल्याचे गणेश सातव पाटील यांनी सांगितले.