चंद्रपूर – चंद्रपूर मधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघिण मृत अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या वाघिणीची शिकार झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पामध्ये हरणं मारण्यासाठी फासे टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. आणि त्यामुळेच या फाशात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाला असल्याचे समजते. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असल्याचे एका वन अधिकाऱ्याने सांगितले आहे. वन विभाग याबाबत पुढील तपास करत आहेत.