वाघोली, दि. (प्रतिनिधी);. हवेली तालुक्याच्या तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथील ग. नं. १४१३ मधील
चेअरमन, वाघेश्वर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था वाघोली, ही इमारत सरकार जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून या कामी संबंधितांना नोटीस काढण्यात आल्या असून या कारवाईची चर्चा वाघोली मध्ये मोठया प्रमाणावर निर्माण झाली आहे.
मा. जिल्हाधिकारी सो. पुणे महसूल शाखा यांचे कार्यालय कडील आदेश अन्वये मौजे वाघोली, ता. हवेली,जि.पुणे येथील ग.नं. १४१३ मधील चेअरमन, वाघेश्वर विविध कार्यकारी सहकारी विविध सेवा संस्था वाघोली प्रतिग्रहिता यांचेकडून काढून घेऊन इमारतीसह सरकार जमा करणेबाबत आदेश संदर्भिय पत्रान्वये पारित करणेत आलेले आहेत.
मा. जिल्हाधिकारी सो. पुणे यांचेकडील निर्देशानुसार प्रतिग्रहिता, चेअरमन, वाघेश्वर विविध कार्यकारी सहकारी विविध सेवा संस्था वाघोली प्रतिग्रहिता यांचेकडून काढून इमारतीसह सरकार जमा करणेकामी सदरची नोटीस संबंधित नागरिकांना बजावण्यात आली असून या इमारतीचा दि. १७/०८/२०२२ रोजी ताबा काढून घेणेची कार्यवाही करणेत येणार आहे.
मौजे वाघोली, ता. हवेली, जि.पुणे येथील ग. नं. १४१३ मधील अतिक्रमण निष्कासित करणेकामी दि. १७/०८/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा. वेळ निश्चित करणेत आलेली असून, विषयांकित मिळकतीमधील इमारतीचा दि. १७/०८/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता ताबा द्यावा अन्यथा पोलीसांच्या मदतीने सदर जागेचा ताबा घेण्यात येईल. आणि हया प्रकरणी कोणत्याही प्रकारे नुकसान झाल्यास अगर चीजवस्तु गेल्यास त्याबद्दल महाराष्ट्र शासन अगर शासकीय यंत्रणा कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. असे तहसिलदार हवेली तृप्ती कोलते- पाटील यांनी नोटीस मध्ये नमूद केले आहे.