मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या आगामी ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत असून, फॅन्सला देखील ही जोडी आवडली आहे. ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेड’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच नुकतंच एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून, आज आणखी एका नवीन गाण्याचा टिझर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे या नवीन टिझर मध्ये बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच, अभिनेता सलमान खान असल्याचं दिसून येत आहे. स्वतः सलमान खानने हा टिझर आपल्या सोशल मीडिया आकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये त्याने रितेश देशमुख याला वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा दिल्यात आहेत. या गाण्यात भाई जानचा अतिशय वेगळा आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी देखील भरभरून कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर, या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार मुख्य भूमिकेत असल्याचं दिसून येणार आहे. तर आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटातील गीते अजय-अतुल आणि गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत.