जिनिंग प्रेसिंगच्या तज्ज्ञ संचालकपदी वाबळे

कोपरगाव -कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी सुरेगाव येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव यशवंतराव वाबळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या संचालक मंडळाची मासिक सभा नुकतीच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेत वाबळे यांची एकमताने तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल काळे यांनी वाबळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी वाबळे म्हणाले, सहकार महर्षी माजी खासदार शंकररावजी काळे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक सहकारी संस्था स्थापन करून त्या संस्था सातत्याने प्रगतिपथावर ठेवल्या. त्यापैकीच ही सोसायटीही आहे. संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडील.

यावेळी सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, उपाध्यक्ष भाऊसाहेब देवकर, संचालक सचिन आव्हाड, किसन आहेर, राऊसाहेब मोरे, बशीर शेख, काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, माजी सदस्य रवींद्र देवकर, संतोष वाबळे, जिनिंगचे जनरल मॅनेजर सुरेश काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.