संजय दौंड यांना विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई : संजय पंडितराव दौंड यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवड झाली असून आज विधानभवनातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ सभागृहात, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.

विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य, अधिकारी आणि दौंड यांचे निकटचे स्नेही उपस्थित होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.